महाराष्ट्र मुंबई

काँग्रेस नेता म्हणतो…निवडणुका जिंकणं तर दूर पक्ष आपलं भविष्यही ठरवू शकत नाही!

मुंबई |  महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या विजयाची शक्यता कमी आहे. तसेच पक्ष सध्या आपलं भविष्यही ठरवू शकत नाही अशा परिस्थिती पोहोचला आहे, असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी केलं आहे.

2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यातूनच पक्ष अद्याप बाहेर पडला नसल्यानं पक्षाला संकटांचा सामना करावा लागत आहे, असं सलमान खुर्शीद यांनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीत आम्हाला पराभवाचा सामना का करावा लागला याचं एकत्रित विश्लेषणही आम्ही करू शकलो नाही. पक्षातील ज्येष्ठ नेते पक्षापासून दूर गेले हे आमच्यासमोरील मोठं संकट आहे, असंही सलमान खुर्शीद यांनी म्हटलं आहे .

दरम्यान,  ऑक्टोबर महिन्यात दोन्ही राज्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर पक्षाच्या नव्या अध्यक्षाच्या नावावर विचार केला जाणार असल्याचंही, सलमान खुर्शीद यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या