मोठी बातमी! सत्यजित तांबेंच्या खेळीमुळे काँग्रेसला धक्का

नाशिक | पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congress) सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यांच्याकडे पक्षाचा एबी फॉर्म देखील होता. मात्र तरीही सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तर दुसरीकडे त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

सत्यजित तांबेंच्या या खेळमुळे काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. आता सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे पिता-पुत्रावर आज पक्षाकडून कारवाई करण्यात येणार आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देताना  बंडखोरांना काँग्रेस पाठिंबा देणार नसल्याचं जाहीर केलं आहे. तसेच बाळासाहेब थोरात देखील संपर्कात नसल्याचा गौप्यस्फोट नाना पटोले यांनी केला आहे.

काँग्रेस कधीही बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देणार नाही. त्यामुळे सत्यजित तांबे यांना काँग्रेसचं समर्थन नाही. काल दुपारपर्यंत बाळासाहेब थोरात संपर्कात होते, मात्र या घटनाक्रमानंतर ते संपर्कात नसल्याची माहिती पटोले यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-