नवी दिल्ली | पुलवामात झालेला दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानचेचं कारस्थान असल्याचं पाकिस्तानच्या मंत्र्याने सांगितलं आहे. यावरून भाजपाने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय.
केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसवर टीका केलीये. काँग्रेसने देशाची माफी मागितली पाहिजे अशा आशयाचं ट्विट केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे.
प्रकाश जावडेकर त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, “पुलवामा येथे हल्ला केल्याचं पाकिस्तानने कबूल केलंय. आता काँग्रेस आणि बाकी लोकं जे म्हणत होते की हा कट आहे त्यांनी माफी मागितली पाहिजे.”
14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-श्रीनगर महामार्गावर पुलवामामध्ये सुरक्षा दलांच्या गाडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 40 जवानांना वीरमरण आलं होतं. त्यावेळी काँग्रेस व इतर पक्षांनी हा हल्ला म्हणजे ‘राजकीय कट-कारस्थान’ असल्याचं म्हटलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
मुख्यमंत्र्यांवर 12 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप, राज्यपालांकडे चौकशीची मागणी
विधानपरिषदेसाठी उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेला होकार!
‘मी 3 वर्षांची असताना….’; अभिनेत्री फातिमा सना शेखचा खळबळजनक गौप्यस्फोट
“भाजपमध्ये अनेकजण आले आणि गेले, आपण पक्ष सोडल्याने अनागोंदी माजणार नाही”
“कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी एसटीची मालमत्ता गहाण ठेवणं महाराष्ट्राला शोभत नाही”