Top News महाराष्ट्र यवतमाळ

‘सोबत चालायचं असेल तर काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद द्यायला पाहिजे’; काँग्रसेच्या ‘या’ बड्या नेत्यानी केली मागणी

यवतमाळ | गेल्या काही दिवसांत राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीमध्ये मतभेद होताना दिसून येत आहेत. अशातच समसमान कार्यक्रमावर सरकार आहे आणि सर्वांना सोबत घेऊन चालायचं असेल, तर काँग्रेसला उपमुख्यमंत्री पद द्यायला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी केली आहे.

महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी तिन्ही पक्ष जेव्हा एकत्र आले, तेव्हाच उपमुख्यमंत्री पद काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार असल्याचं ठरलं होतं. मात्र शेवटी उपमुख्यमंत्री पद राष्ट्रवादीला देण्यात आलं असल्याचं ठाकरेंनी सांगितलं.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी कुठल्या पक्षाचे असल्यासारखं वागत आहेत. भाजपचे राजकारण राजभवनावरुन चालत असल्याचं  म्हणत ठाकरेंनी विरोधी पक्षनेत्यांना टोला लगावला आहे.

दरम्यान, माणिकराव ठाकरे यांनी केलेल्या मागणीवर सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून राष्ट्रवादीच्या पदवीधर अध्यक्षाने थेट कॅनडाच्या पंतप्रधानांनाच लिहिलं पत्र

कृषी कायद्यात काय कमतरता हे शेतकरी नेत्यांना सांगता आलं नाही- नरेंद्रसिंह तोमर

“आंदोलनाच्या ठिकाणी खिळे ठोकणं?, हे केंद्र सरकारला शोभत का?”

‘…हे पहिले केंद्राला सांगा’; अजित पवारांनी फडणवीसांना फटकारलं

‘तो माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता पण आता…’; या मराठी दिग्दर्शकाने सचिनला सुनावलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या