बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेसने सचिन सावंत यांना उमेदवारी द्यायला हवी होती- संजय राऊत

मुंबई |  विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी त्याचबरोबर भाजपने आपापले उमेदवारी जाहीर केले आहेत. कुणी जुन्या जाणच्या जाणत्या नेत्यांना संधी दिली आहे तर कुणी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. यावरच आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे.

काँग्रेसकडून सचिन सावंत यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळेल, अशी शक्यता होती. त्यांचं नाव देखील संभाव्य उमेदवारांमध्ये आघाडीवर होतं. म्हणूनच सचिन सावंत यांच्यासारख्या आक्रमक, अभ्यासू पदाधिकार्‍याला संधी मिळेल असे वाटत होते. पण ती मिळाली नाही, असं खंत संजय राऊत यांनी व्यक्त केली होती.

सचिन सावंत यांच्याबरोबर विदर्भाचे अतुल लोंढे यांचेही नाव चर्चेत होते, पण कोणास फारसे माहीत नसलेले राजेश राठोड व पापा मोदी ही मराठवाड्यातील नावे समोर आली. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधान परिषद निवडणुकीच्या ‘पेल्यात’ थोडा खळखळाट झाला. मात्र आता काँग्रेस पक्षाने एकच उमेदवार रिंगणात ठेवल्याने निवडणुकीचा मार्ग सुकर झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला आणि परंपरेला अनुसरूनच हे घडत आहे, असं राऊत म्हणाले आहेत.

दुसरीकडे भाजपने दिलेल्या उमेदवारांवर देखील राऊत यांनी भाष्य केलं आहे. भाजपने आपले उमेदवार जाहीर करून पक्षातील प्रस्थापितांना धक्काच दिला आहे. ‘भाजपला मत देऊ नका,’ असे जाहीर सभांतून सांगणार्‍या गोपीचंद पडळकरसारख्यांना उमेदवारी दिली आहे, असं ते म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

पंतप्रधानांचा आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद; ‘लॉकडाऊन’सह या प्रमुख मुद्द्यांवर होणार चर्चा

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन यांची प्रकृती स्थिर

महत्वाच्या बातम्या-

देशातल्या या राज्यांना कोरोना आणखी शिवला देखील नाही; कौतुक करावं तेवढं कमी…

नको ते करायला गेली; पूनम पांडेला पोलिसांनी केली अटक

‘माघारी’पेक्षा महाराष्ट्राचे हित महत्त्वाचं होतं, काँग्रेसच्या भूमिकेचं सामनामधून कौतुक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More