बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“धमकी कोण देतंय उघड झालंच पाहिजे, पुनावालांच्या सुरक्षेची जबाबदारी काँग्रेस घेईल”

मुंबई | अदर पुनावाला यांनी परदेशात टाइम्स या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत भारतातील काही मोठे नेते आणि काही राज्यांचे मुख्यमंत्री हे आपल्याला लसींवरून धमकी देत असल्याचं बोलून दाखवलं होतं. तसेच त्यामुळेच आपण पुण्यात होत असलेलं लसींचं उत्पादन लंडनमध्ये हलवणार असल्याचा विचार करत आहोत, असंही त्यांनी सांगितलं होतं. या सर्व प्रकरणात महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पुनावाला यांना केंद्र सरकारने दिलेल्या सुरक्षेवरून प्रश्न उपस्थित केले आहेत.

अदर पुनावाला यांच्याकडे भारताला लस पुरवण्याचं मोठं काम आहे. तसेच ते म्हणतात की, ‘माझ्यावर काही मोठे नेते दबाव आणत आहेत, मी जर बोललो तर माझा शिरच्छेद केला जाईल’ ते नेते कोण आहेत हे पुनावालांनी उघड करावं त्यांच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी काँग्रेस पक्ष घेईल, असं महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर शरसंधान साधल्याचं पाहायला मिळालं. पुनावालांनी कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेसाठी अर्ज केला नसताना त्यांना केंद्र सरकारने सुरक्षा का दिली यामागची वास्तविकता नेमकी काय आहे हे जनतेसमोर आलं पाहिजे अशी मागणी काँग्रेस पक्षातर्फे नाना पटोले यांनी केली.

लोकांचा जीव वाचणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे पुनावाला यांना पाहिजे तेवढी सुरक्षा आम्ही राज्य सरकारतर्फे देऊ तसेच काँग्रेस पक्षातर्फे ही विशेष सुरक्षा पुरवू, अशा प्रकारची भूमिका असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या –

अदर पुनावालांनी मागणी केली नसताना त्यांना सुरक्षा का पुरवली- नाना पटोले

जावई आणि सासू प्रेमसंबंधामुळे आले पळून, मात्र पुढे घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

“अदर पुनावालांना शिवसेनेच्या गुंडांनी लसीसाठी धमकी दिली”; वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसेना आक्रमक

…अन् भर सामन्यात डेव्हिड वॅार्नर ढसाढसा रडला, फॅन्सही हळहळले!

सरकारने परमबीर सिंह यांच्या चौकशीचे आदेश दिलेल्या ‘त्या’ पोलीस महासंचालकाने दर्शवली असमर्थता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More