देश

“देशातील सर्व पेट्रोल पंपांचं नाव बदलून नरेंद्र मोदी वसुली केंद्र करा”

नवी दिल्ली | तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 28 आणि 29 पैसे प्रतिलिटर वाढविले आहेत. त्यामुळे अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर पुन्हा एकदा नव्वदी पार गेले आहेत.

पेट्रोलचे दर 90 पार केल्यानंतर देशातील सर्वसामान्य नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीवरून काँग्रेस नेते श्रीवत्स यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत सणसणीत टोला लगावला आहे.

पेट्रोल दर  90 रुपये, वास्तव किंमत 30 रुपये, मोदी टॅक्स 60 रुपये असं म्हणत देशातील सर्व पेट्रोल पंपांची नाव बदलून नरेंद्र मोदी वसुली केंद्र करण्यात यावं, असं श्रीवत्स यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजप नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामींनी पेट्रोलचे दर 40 रुपये प्रति लिटर असायला हवेत, असं म्हटलंय.

 

 

 

थो़डक्यात बातम्या-

‘खराब रस्ते बनवाल तर…’; नितीन गडकरींचा इशारा

“योगी आदित्यनाथ यांनी फिल्म सिटी उभारण्याबाबत दूरदृष्टी दाखवली, प्रकल्पात सहभागी व्हायला मला आवडेल”

शरद पवारांच्या नावाने ठाकरे सरकार लागू करणार ‘ही’ योजना!

एक दिवस ही ‘ईडी’च भाजपला संपवल्याशिवाय राहणार नाही- धनंजय मुंडे

ठाकरे सरकारला धक्का! मराठा आरक्षणावरील तात्काळ स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या