बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“श्रेय स्वत:ला घ्यायचं आणि दोष दुसऱ्याला द्यायचा हाच मोदींचा मंत्र”

नवी दिल्ली | गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी भूपेंद्र पटेल यांची निवड करण्यात आली आहे. भाजप नेते विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती.

मुख्यमंत्रिपदाचा कारभार नेमका कोणाकडे सोपवला जाईल हे ताडण्यासाठी राजकीय जाणकारांकडून अनेक तर्कवितर्क लावले जात होते. या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्याची निवड करण्यासाठी भाजपच्या विधिमंडळ सदस्यांची आज बैठक झाली. या बैठकीत भूपेंद्र पटेल यांच्या नावावर एकमत झालं. आता पटेल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

मुख्यमंत्री बदलण्यात आल्यानंतर आता काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. काँग्रेसने ट्विटरवर #CM_नहीं_PM_बदलो ही मोहीम सुरू केली असून मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. श्रेय स्वत:ला घ्यायचं आणि दोष दुसऱ्याला द्यायचा हाच मोदींचा मंत्र, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

मुख्यमंत्री बदलल्याने पंतप्रधानांचं अपयश झाकलं जाणार नाही, CM नाही तर PM बदला. भाजप सर्व ठिकाणी आणि सर्व राज्यांमध्ये अयशस्वी राहिली आहे. भाजपने संपूर्ण भारतालाच अपयशी ठरवलं. मुख्यमंत्री बदलल्याने पंतप्रधानांचे अपयश काही झाकले जाणार नाही, असं म्हणत काँग्रेसने टीकास्त्र सोडलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही…’; महत्त्वाची माहिती समोर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलं अक्षय कुमारला पत्र, म्हणाले…

कोरोना अपडेट! मुंबईची आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी!

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

चिंताजनक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा आकडेवारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More