भाजपचा बालेकिल्ला काँग्रेसनं हिसकावला; कसब्यात रविंद्र धंगेकर विजयी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | कसबा मतदार संघात कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे अकरा हजार चाळीस मतांनी विजयी झाले आहेत. त्यांचे कार्यकर्ते विजयाचा जल्लोश साजरा करत आहेत. 

28 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या गडाला धंगेकरांनी सुरुंग लावला आहे. पहिल्या फेरीपासून अगदी शेवटच्या 21 व्या फेरीपर्यंत रवींद्र धंगेकर यांनी आघाडी कायम ठेवली. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पाच ते सहा मंत्री कसब्यात तळ ठोकून होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील शेवटचे सहा दिवस कसब्यातच होते. ब्राह्मण समाजाची नाराजी, अँन्टीइन्मबन्सीचा फटका, गिरीश बापटांची अनुपस्थिती या सगळ्यामुळे भाजपला कसब्यात जोरदार फटका बसला.

भाजपने मला उमेदवारी दिली होती. आम्ही पूर्ण प्रयत्न केले पण मतदारांनी मला स्वीकारले नाही. मला का स्वीकारले नाही याबाबत मी आत्मचिंतन करेल. या निवडणुकीत मी कमी पडलो आहे. माझ्या दृष्टीने हा निकाल धक्कादायक आहे. 2009 पासून हा संमिश्र असलेला हा मतदार झाला आहे. ही जागा सलग भाजपने जिंकली असली तरी यावेळी तिरंगी लढत झाली आहे, असं रासने म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-