देश

काँग्रेस प्रवक्ते राजीव त्यागी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

नवी दिल्ली |  काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव त्यागी यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झालं. आज संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

राजीव त्यागी यांच्या आकस्मिक निधनाने मोठं दुःख झालं, ते एक कट्टर काँग्रेसी आणि एक सच्चा देशभक्त होते, अशा आशयाचं ट्विट करून काँग्रेसने सहवेदना व्यक्त केल्या आहेत.

राजीव त्यागी यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यावर त्यांना तत्काळ गाजियाबाद येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करताच त्यांना मृत घोषित केले.

संध्याकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान त्यांनी एका डिबेट शोमध्ये सहभाग घेतला होता. त्याअगोदर त्यांनी डिबेटमध्ये सहभागी होत असल्याचं ट्विट करून देखील सांगितलं होतं. डिबेट शोमधून त्यागी काँग्रेसची खंबीर भूमिका मांडायचे.

महत्त्वाच्या बातम्या-

केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना कोरोनाची लागण

आनंदाची बातमी- मुंबईत कोरोनाचे 1 लाख रुग्ण बरे तर आज कोरोनामुक्त रूग्णांचा सर्वांत मोठा आकडा!

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या