Top News महाराष्ट्र मुंबई

पालघरच्या घटनेमागे भाजपचा हात; सचिन सावंत यांचा गंभीर आरोप

मुंबई |  गेल्या आठवड्यात पालघरच्या झालेल्या घटनेने संपूर्ण भारत हळहळला. यानंतर राजकारण्यांमध्ये अनेक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या गेल्या. आता याप्रकरणी काँग्रेसने भाजपवर गंभीर आरोप केला आहे. पालघरच्या घटनेमागे भाजपचा हात असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

पालघर प्रकरणी अटक केलेल्या आरोपींमध्ये भाजपचे कार्यकर्ते आहेत परंतू या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना भाजपने आणखीही पक्षातून काढून टाकले नाहीत, यावरून ही शंका अधिक गडद होते की पालघरच्या घटनेमागे भाजपचाच हात आहे, असं सचिन सावंत म्हणाले आहेत. गुरूवारी सोशल मीडियावरून पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सावंत यांनी हा गंभीर आरोप केला आहे.

गडचिंचले ग्रामपंचायतीवर पाठीमागच्या 10 वर्षापासून भाजपची सत्ता आहे. भाजप कार्यकर्ते ईश्वर निकोले आणि भाऊ साठे यांची नावं आरोपींमध्ये आहेत आणि ते सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. या प्रकरणात सत्ताधारी वर्गाचं किंवा काँग्रेस पक्षाचा एकही व्यक्ती सामिल नाहीये. पालघर घटनेचा निषेध करायला भाजपने एवढा वेळ का घेतला? असा सवाल देखील त्यांनी यावेळी विचारला.

दुसरीकडे साधूंचे मारेकरी भाजपचे पदाधिकारी म्हणून सावंत यांनी याअगोदर ट्विटरवरून त्यांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. आरोपींच्या यादीत आणखी बरेच भाजप कार्यकर्ते आहेत. तसेच अटक झालेल्यांच्या यादीत भाजपच्या बूथ प्रमुखांचीही नावे असल्याचं सचिन सावंत यांनी म्हटलंय.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

धारावीने करून दाखवलं, कोरोना फैलावाचा वेग मंदावला!

मुस्लिम बांधवांना शुभेच्छा… रमजानमुळे समाजातील बंधुभाव अधिक दृढ होईल- उद्धव ठाकरे

दारू पिणाऱ्यांचं दु:ख राज ठाकरेंनी सरकार दरबारी मांडलं, व्वा ‘राज’बाबू व्वा…; संजय राऊतांचे शालजोडीतून टोले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या