मुंबई | काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांचे भाऊ सुनीत वाघमारे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. सुनीत वाघमारे यांना पोलिसांनी केली अटक केली आहे.
सुनीत वाघमारेंवर महिलेचा बलात्कार, फसवणूक आणि धमकावण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. सुनीत वाघमारे हे माजी स्वीकृत नगरसेवक राहिले असून ते काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांचे भाऊ आहेत.
सुनीत वाघमारे यांच्या अटकेची काँग्रेसने दखल घेत त्यांच्या अटकेनंतर काँग्रेसने त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. सुनीत यांच्याशी काँग्रेसचा कोणताही संबंध नसल्याचं काँग्रेसने स्पष्ट केलं आहे. याबाबत काँग्रेचे नेते सचिन सावंत यांनी ट्विट केलं आहे.
काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचे बंधू सुनीत वाघमारे संदर्भात भाजप फार चिंतन करीत असल्याचे समजते. मात्र, सुनीत यांचा काँग्रेसशी कोणताही संबंध नाही. 2017 साली मुंबई मनपा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्यामुळे सुनीत त्यांना पक्षातून निष्कासित करण्यात आले आहे, असं सचिन सावंत यांना आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
थोडक्यात बातम्या-
“एकाला एक दुसऱ्याला दुसरा न्याय नको, धनंजय मुंडेंचाही राजीनामा घ्या”
ते सगळ्यात मोठे गुंड; भर भाषणात हर्षवर्धन जाधवांच्या मैत्रिणीनं केलेल्या आरोपांनी खळबळ
धक्कादायक! भाजपच्या ‘या’ खासदाराचं कोरोनामुळे निधन
कार्तिक आर्यन समोर येताच तिने केलं असं काही की…; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
वाढत्या कोरोनाच्या धोक्यामुळे ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा बंद
Comments are closed.