बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काँग्रेसचा चप्पल उचल्या प्रवक्ता सचिन सावंत जनतेतून कधी आमदार होऊ शकत नाही”

सिंधुदुर्ग | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले होते. अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला 100 कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा खळबळजनक दावा सिंग यांनी केला. याप्रकरणी भाजप आणि विरोधक आक्रमक झाले आहेत.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी या प्रकरणावर भाष्य करत भाजप व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सचिन सावंत यांच्या या टीकेला भाजप नेते निलेश राणे यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे.

‘काँग्रेसचा चप्पल उचल्या प्रवक्ता सचिन सावंत जनतेतून कधी आमदार होऊ शकत नाही आणि राज्यपालांच्या कोट्यातून पण नाही. ज्याला आमदारकीला फक्त 1200 मतं मिळाली तो सचिन सावंत जनेतून नगरसेवक पण होऊ शकत नाही. पण वार्ता एवढ्या मोठ्या करतो की जसं 300 खासदार ह्यानेच निवडून आणले. एक नंबर फालतू,’ अशी जहरी टीका निलेश राणे यांनी ट्विटरद्वारे केली आहे.

दरम्यान, राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याचं वातावरण भारतीय जनता पक्षाकडून जाणीवपूर्वक निर्माण केलं जात आहे. विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यांत कायदा सुव्यवस्था बिघडल्याचं चित्र निर्माण करायचं, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या – 

राष्ट्रवादी आक्रमक; परमबीर सिंह यांच्या संपत्तीबाबत केली ‘ही’ मोठी मागणी

दिवंगत सुशांत सिंग राजपूतच्या ‘छ‍िछोरे’ला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

काही होणार नाही; प्रकरण वाझे साहेबांकडेच आहे; मनसुख हिरेन यांचं भावासोबतचं संभाषण ‘एनआयए’कडे

चुकीला माफी नाही! राष्ट्रवादीच्या ‘त्या’ नेत्यांवर अखेर गुन्हा दाखल

आमीर खानच्या मुलीसोबत काम करण्याची संधी; 25 जागा, ‘इतका’ मिळेल पगार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More