बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“रक्तात मिठाचे प्रमाण कमी झाले तर असे भ्रम होतात म्हणे!”

मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील एका कार्यक्रमात मोठं वक्तव्य केलं होतं. मला आजही मी मुख्यमंत्री असल्याचं वाटतंय, असं फडणवीस म्हणाले होते. त्यावरून आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. त्यावर आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.

कल्पनेतही नसताना मविआ सरकार स्थापन झाले हा झटका मोठा होता याची जाणीव आहे. मानसिक धक्क्यातून अनेकदा अशा प्रकारची लक्षणे उद्भवू शकतात. रक्तात मिठाचे प्रमाण कमी झाले तरी असे भ्रम होतात म्हणे!, असा टोला सचिन सावंत यांनी लगावला आहे. लवकरात लवकर डॉक्टरला दाखवणे गरजेचे आहे. आधीच दोन वर्षे अंगावर काढली आहेत, काळजी घ्यावी, असा खोचक सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील टीका केली आहे. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री हा शब्द कोणी खेचू शकत नाही, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात उलट सुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

दरम्यान, सचिन सावंत यांनी वेळोवेळी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. ‘जनतेने मला भरभरून प्रेम दिलं आहे. मला आजही वाटतं की मी मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या-

“शाहरुख खानच्या मुलाला सोडून द्या, मी पण गांजा घेतला होता”

“भैय्या दवाखान्यात जाऊनसनी काय करू?, मेलो तरी चालेल पण मागं हटायचं नाय”

”जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ शब्द कोणी खेचू शकत नाही’; पंकजा मुंडेंचा फडणवीसांना टोला

“…तर मोठी किंमत मोजावी लागेल”; मेहबूबा मुफ्तींचा मोदींना थेट इशारा

रामदास कदमांना दसरा मेळाव्याचं निमंत्रण नाही?; अरविंद सावंतांचं मोठं वक्तव्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More