“मर्सिडीज सोबत भाजप पदाधिकाऱ्याचा फोटो, भाजप नेते याचा खुलासा करतील का?”
मुंबई | मागील काही दिवसांपासून मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरण आणि त्यानंतर सचिन वाझे चौकशी प्रकरण गाजत आहे. सचिन वाझे चौकशी प्रकरणात वेगवेगळे धागेदोरे समोर येत आहेत. तपास एनआयएकडे गेल्यापासून या प्रकरणाला नवं वळणं लागलेलं दिसत आहे. एनआयएच्या पथकानं मर्सिडीज गाडीचा ताबा घेतला होता. ही गाडी एका भाजप पदाधिकाऱ्याची असल्याची माहिती काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे.
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मर्सिडीज गाडीसोबत असलेल्या भाजप पदाधिकाऱ्याचा फोटो ट्विट केला आहे. त्याच बरोबर त्यांनी पदाधिकाऱ्याला मिळालेलं नियुक्तीपत्र, भाजप कार्यक्रमात असलेला पदाधिकारी आणि घटनास्थळी सापडलेली मर्सिडीज गाडी यांचा फोटो ट्विट केला आहे. यामुळे या प्रकरणात आता भाजपचा कनेक्शन समोर येताना दिसत आहे.
मनसुख हिरेन वापरत असलेले मर्सिडीज 17 फेब्रुवारी रोजी ठाणे भाजप पदाधिकाऱ्याचा फोटोत दिसत आहे. महाराष्ट्र भाजपचे नेते यावर खुलासा करतील का?, असा प्रश्न देखील सचिन सावंत यांनी यावेळी उपस्थित केला आहे. या गाडीत बनावट नंबर प्लेट आणि 5 लाख रूपयांची रोकड सापडली होती.
दरम्यान, ही गाडी सचिन वाझे चालवत होते. असा खुलासा एनआयएनं केला होता. त्याआधी वाझेंना काळ्या मर्सिडीज गाडीसमोर आणून त्यात मिळालेली रक्कम मोजली होती. तर नकली नंबर प्लेट देखील जप्त करण्यात आल्या होत्या.
पाहा ट्विट-
Now BJP connection emerges – the Mercedes car allegedly used by Mansukh Hiren on 17th February is seen in a photograph of BJP office bearer of Thane.
Would @BJP4Maharashtra leaders give explanation? pic.twitter.com/w64FAyfDpi— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 17, 2021
थोडक्यात बातम्या-
महादेव जानकर पुन्हा पवारांना शह देण्याच्या तयारीत!
महिंद्रा जीप चालकाचा ‘हा’ प्रताप वाचून तूम्हीही व्हाल हैराण
‘एनआयए’चा मोठा खुलासा! CCTV मध्ये दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच!
सचिन वाझे प्रकरणावरून अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला, म्हणाल्या…
‘ती’ घटना घडली आणि श्वेता बाॅलिवूड पासून दुरावली, श्वेता बच्चनचा राज उघडं
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.