राज्यात आणि देशात काॅंग्रेस सक्षम पर्याय! नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य
अहमदनगर | काॅंग्रेस पक्षाच्या नेतृत्वावरून गेल्या काही वर्षापासून अनेक राजकीय चर्चा होत आहेत. अलिकडेच विविध राज्यांमधील गोंधळांमुळे काॅंग्रेस पक्षाच्या नेतृत्वावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यावरून काॅंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मीच विरोधक आणि इतर मंत्र्यांना सुनावलं. अशातच आता काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
काॅंग्रेस हा देशातील सर्वात मोठा पक्ष असून सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. भाजपसारख्या पोकळ घोषणा देणारा पक्ष नसून खऱ्या अर्थाने सबका साथ देणारा पक्ष असल्यानेच काॅंग्रेस पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सर्व जाती धर्माला योग्य प्रतिनिधित्व देण्याचं काम काॅंग्रेसमध्ये केलं जातं. सर्वांच्या विकासासाठी झटणारा काॅंग्रेस पक्ष हाच देशात व राज्यात सक्षम पर्याय आहे, असं नाना पटोले म्हणाले.
काॅंग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते नाना पटोले आणि महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काॅंग्रेस पक्षाचा मेळावा पार पडला. तेव्हा अहमदनगरमधील अनेक कार्यकर्त्यांनी काॅंग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. तेव्हा बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
दरम्यान, देशात मागील काही वर्षापासून धर्माच्या नावावर राजकारण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम केलं जातं आहे. लोकशाहीला संपवण्याचे कटकारस्थान रचलं जात आहे. परंतु, भारत हा लोकशाही आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या तत्वावर चालणारा देश आहे. जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठीच काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेना मिळून राज्यात एक भक्कम पर्याय उभा केला असल्याचं महसुल मंत्री बाळासाहेब यांनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
भारत करणार लवकरच लसीकरणात विक्रम, लस घेणाऱ्यांची संख्या 100 कोटींच्या घरात
“शरद पवार भिजल्याची बातमी झाली, पण…”; ‘या’ नेत्याचा पवारांवर हल्लाबोल
“आमची दिवाळी जर अंधारात जाणार असेल तर, मुख्यमंत्र्यांना दिवाळी साजरी करू देणार नाही”
आर्यन खानचं समुपदेश केलं मग पुरावे द्या! नवाब मलिकांचं NCB ला खुलं आव्हान
“….म्हणून राज्यातील शेतकऱ्यांना आशेचे किरण दिसू लागले आहेत”
Comments are closed.