बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“चंद्रकांत पाटील म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला व्हायरस”

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आपल्या मतदारसंघात म्हणजेच वाराणसीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याबद्दल वक्तव्य केलं होतं. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवाजी महाराजांचं साम्राज्य आणि हिंदुत्वाबद्दल वक्तव्य केलं आहे. यानंतर मात्र राज्यात वादाला सुरूवात झाली आहे. काॅंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर जहरी टीका केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानं महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला आहे. शिवराय, फुले, शाहुंच्या महाराष्ट्राला धर्मांद बनवण्याचा प्रयत्न पाटील यांनी चालवला आहे. चंद्रकांत पाटील हे पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला व्हायरस आहेत, अशी खरमरीत टीका अतुल लोंढे यांनी केली आहे.

छत्रपती शिवाजी महारांज यांनी कधीही एका जाती धर्माला थारा दिला नाही. सर्व जाती धर्मांनासोबत घेऊन छत्रपतींनी हे साम्राज्य उभं केलं होतं. छत्रपतींच्या सैन्यात सर्व धर्मांच्या सैनिकांचा समावेश होता. छत्रपती शिवाजी महारांजाचा संबंध हिंदु व्होट बॅंकेशी जोडून पाटील यांनी अकलेचे तारे तोडले आहेत, अशी टीका लोंढे यांनी केली आहे.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण काही चुकीचं बोललं नसल्याचं स्पष्टीकरण पाटील यांनी दीलं आहे. तर भाजप छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर आपल्या राजकारणासाठी करत आहे, अशी टीका विरोधी पक्षांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या 

…अन् भर कार्यक्रमात भाजप खासदाराने पैलवानाच्या कानशिलात लगावली

“ओमिक्राॅनच्या पार्श्वभूमीवर राज्यात Pandemic Act लागू करा”

भारताचं टेन्शन वाढलं! ओमिक्राॅनचं शतक पुर्ण, केंद्र सरकारने दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला

“अजित पवारांना कधीही अटक होऊ शकते”, निलेश राणेंच्या दाव्याने खळबळ

झुनझुनवालांना जोर का झटका! ‘या’ शेअर्समुळे फक्त 10 मिनिटात गमावले 318 कोटी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More