बंडखोरांना दणका! कॉँग्रेसकडून बड्या नेत्याच्या मुलासह ‘या’ बंडखोरांचं निलंबन

Congress

Congress | महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. मात्र, अनेक ठिकाणी उमेदवारी न मिळाल्याने महायुतीसह महाविकास आघाडीमध्येही मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचं दिसून आलं. भाजपने नुकतीच 40 बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. अशात कॉँग्रेसनेही (Congress) बंडखोरांवर कारवाई केली आहे.

ज्या कॉँग्रेसच्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. त्यांना 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिली आहे. यामध्ये रामटेक विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र मुळक (Rajendra Mulak), काटोलमधून काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवल्क्य जिचकार (Yajnavalkya Jichkar), पर्वती विधानसभा मतदारसंघातून आबा बागुल (Aaba Bagul) आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून कमल व्यवहारे (Kamal Vyavhare) यांना 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आलंय.

कॉँग्रेसकडून ‘या’ नेत्यांचं निलंबन

यासोबतच जयश्री पाटील यांना देखील निलंबित करण्यात आलंय. सांगलीत काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिल्याने त्या नाराज झाल्या होत्या. त्यांनी अपक्ष म्हणून आता पृथ्वीराज पाटील यांना आव्हान दिलं आहे. तर, जयश्री पाटील यांना खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांनीही समर्थन दिलं आहे.

कॉँग्रेसकडून अशा बंडखोरांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसने काल खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये पाच गॅरंटी जाहीर केल्या आहेत. राहुल गांधी काल महाराष्ट्रात होते. त्यांची काल भव्य सभा झाली. आता 13,16 आणि 17 नोव्हेंबरला प्रियंका गांधी महाराष्ट्रात येत असल्याची माहिती काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला (Ramesh Chennithala) यांनी दिली आहे. (Congress)

भाजपकडूनही बंडखोरांची हकालपट्टी

दरम्यान, बंडखोर नेत्यांवर कॉँग्रेससह भाजपकडूनही कारवाई करण्यात आली आहे. भाजपने राज्यातील 37 विधानसभा मतदारसंघातील 40 बंडखोरांवर कारवाई केली आहे. पक्षाचा आदेश डावलून शिस्तभंग केल्यामुळे 40 जणांची हकालपट्टी करण्यात आली आहे. अशात कॉँग्रेसनेही बंडखोरांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.  (Congress)

News Title :  Congress suspends rebel leaders from party 

महत्वाच्या बातम्या –

संजय राऊत माविआचे xxx, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते…

मुंडे बहीण भावावर प्रवीण महाजनांच्या पत्नीचा अत्यंत गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

‘ज्यांची घरं बुलडोझरने पाडली त्यांना…’; सुप्रीम कोर्टाचा योगी सरकारला मोठा झटका

“मी आमदार झालो तर पोरांचे लग्न करुन देणार”,’या’ उमेदवाराचं अजब आश्वासन

“फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते..”; राऊत संतापले

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .