नवी दिल्ली | केंद्रीय अर्धमंत्री निर्मला सिताराम यांनी अर्थसंकल्प सादर करताना आडीबीआय बँकसह अणखी दोन बँकचे खासगीकरण करण्यात येईल अशी घोषणा केली होती. मात्र या घोषणे दरम्यान उर्वरीत दोन बँक कोणत्या असतील याची माहिती दिली नव्हती. याच पार्श्वभूमीवर आता खासगीकरणाला विरोध करण्यासाठी बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. मात्र अशातच काँग्रेसने मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
आज कर्मचारी संप करत आहेत. तसेच यानंतर आजून कोणी करेल आणि हे थांबलं पाहीजे, असं काँग्रेसने म्हटलं आहे. काँग्रेसने यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये देश नही बिकने दूंगाच्या घोषणा देणाऱ्यांनी एक एक करत सर्व सरकारी मालकीची संपत्ती मोदी सरकार विकत आसून काहीकरुन ते थांबलं पाहीजे, असं काँग्रेसने म्हटलंय.
भाजप विरोधात ट्वीट करत असताना काँग्रेसने एक फोटोसुद्धा शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये एका बाजूला मोदी देश बिकने नही दूंगा अशी घोषणा करत आहे तर दुसरीकडे काही महीला खासगीकरण थांबण्याचे फलक हातात घेऊन संप पुकारताना दिसत आहेत.
दरम्यान, खासगीकरण विरोधात पुकारलेल्या संपामध्ये 10 हजारांहून जास्त शाखांतून काम करणारे 50 हजारांहून जास्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला आहे.
‘देश नहीं बिकने दूंगा’ का नारा देने वाले लोगों के खिलाफ आज बैंक कर्मी हड़ताल पर हैं, कल कोई और होगा। क्योंकि एक-एक कर सारी सरकारी संपत्ति को बेच रही है मोदी सरकार, जिसे हर हाल में रोकना होगा। pic.twitter.com/fruaK1xtRr
— Congress (@INCIndia) March 15, 2021
थोडक्यात बातम्या-
पाॅवर कट बत्ती गुल ; महावितरणाच्या कारवाईनं शेकडो गावं अंधारात
‘महाराष्ट्राने संयम सोडला तर…’; शिवसेनेचा कानडींना इशारा
आमचाही राजकीय पक्ष आहे, आम्ही काही गोट्या खेळत नाही – इम्तियाज जलील
थकित वीजबिल असणाऱ्यांची वीज तोडू नका, अन्यथा…- उदयनराजे भोसले
ईडीची मोठी कारवाई! सुशील कुमार शिंदे यांची मुलगी आणि जावयाची मालमत्ता ईडीकडून जप्त
Comments are closed.