“मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार, मात्र नियंत्रणाचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याकडे असेल”
बिहार | बिहारच्या मुख्यमंत्री पदी पुन्हा एकदा जेडीयूचे नितीश कुमार विराजमान होणार आहेत. शिवाय एनडीएच्या नेतेपदी नितीश कुमार यांची निवड करण्यात आलीये. याच मुद्द्यावर काँग्रेस नेते तारिक अन्वर यांनी प्रतिक्रिया दिलीये.
तारिक अन्वर म्हणाले, नुकतेच नितीश कुमार हे एक एनडीएचे एक चांगले नेते म्हणून समोर आले आहेत. मात्र भाजपाने त्यांना कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आहे.
आता भलेही त्यांची एनडीएचे नेते किंवा मुख्यमंत्री म्हणून निवड झालेली आहे, मात्र दुसऱ्या कुणाकडे तरी त्यांना नियंत्रित करण्याचे रिमोट कंट्रोल असेल, असंही अन्वर यांनी सांगितलंय.
आज सकाळी 11.30 वाजता शपथविधी पार पडणार असून नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. नितीश कुमार सातव्यांदा आणि सलग चौथ्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! बीडमध्ये तरूणीवर अॅसिड हल्ला; हल्ल्यानंतर जिवंत जाळलं
मुख्यमंत्री होण्याची माझी इच्छा नव्हती; नितीश कुमारांचा मोठा खुलासा
बिहारच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा नितीश कुमारांची वर्णी; उद्या घेणार शपथ
प्रसिद्ध अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचं निधन
पुढील 10 ते 20 वर्षे नरेंद्र मोदींना पर्याय नाहीये- बाबा रामदेव
Comments are closed.