बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना विरोधातील लढाईसाठी काँग्रेसची टास्कफोर्स; ‘या’ 18 नेत्यांना जबाबदारी दिली

मुंबई | कोरोनाचं संकट दिवसेंदिवस गंभीर होत चाललं आहे. राज्यात रुग्णांची संख्याही वाढतच आहे. त्यामुळे आता काँग्रेसने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आता कोरोना विरोधातील लढाईसाठी टास्कफोर्स आणि विविध उपसमित्यांची घोषणा केली आहे. त्यासाठी 18 नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली 18 सदस्यांच्या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. माजी खासदार भालचंद्र मुणगेकर हे या टास्क फोर्सचे समन्वयक आहेत. या टास्क फोर्समध्ये खासदार राजीव सातव, मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्यासह18 सदस्य आहेत.

कोविड-19 च्या संदर्भाने सरकारच्या उपाययोजना आणि वास्तव परिस्थिती याबाबत सातत्याने माहिती घेऊन साप्ताहिक अहवाल सादर करणे, ऑडिओ कॉन्फरन्स, व्हिडिओ कॉन्फरन्स, वेबिनार आदी माध्यमातून ही टास्क फोर्स कार्यरत राहणार आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची कोरोना टेस्ट; आला हा रिपोर्ट

राज्यातील मंत्र्यांमध्ये समन्वय दिसत नाही- देवेंद्र फडणवीस

महत्वाच्या बातम्या-

कोरोना: पुण्यात कोरोनाबाधित मृतांची संख्या २० वर तर रुग्ण संख्या २०४

कोरोना विरोधातील लढाईसाठी काँग्रेसची टास्कफोर्स; ‘या’ 18 नेत्यांना जबाबदारी दिली

‘या’ राज्याच्या सरकारनं लॉकडाउन वाढवला; देशातील पहिलं राज्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More