बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

किरीट सोमय्यांचा सत्कार केलेल्या पायऱ्यांवर काॅंग्रेसनं शिपडलं गोमूत्र

पुणे | भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर शिवसैनिकांनी धक्काबुक्की केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर लगेच भाजपनं राज्यभरात आंदोलन करत महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. आता ज्या पायऱ्यांवर किरीट सोमय्या पडले होते त्यावरून चांगलंच राजकारण तापलं आहे.

किरीट सोमय्या यांच्यात आणि शिवसैनिकांमध्ये ज्या पायऱ्यांवर झटापट झाली होती त्या पायऱ्यांवर भाजपनं त्यांचा सत्कार केला. पुणे महापालिका परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सोमय्या आले आणि त्यांनी भाजप नेत्यांकडून सत्कार स्विकारला. त्यानंतर सोमय्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.

सोमय्यांचा सत्कार झाल्यावर त्याच पायऱ्यांवर गोमूत्र आणि गुलाबाचं पाणी शिंपडून काॅंग्रेसनं त्या पायऱ्यांचं शुद्धीकरण केलं आहे. परिणामी कधी नव्हे ते महापालिकेच्या सामान्य असणाऱ्या पायऱ्यांना इतकं महत्त्व प्राप्त झालं आहे. महापालिकेत इतरही प्रश्न असताना फक्त प्रसिद्धीसाठी सोमय्या यांना आणण्यात आल्याची टीका काॅंग्रेसनं केली आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी केलाला हल्ला हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रचलेला कट होता, असा आरोप भाजपनं केला आहे. त्यामुळे हा मुद्दा आणखी किती पेटणार यावर सर्वांचं लक्ष लागलंय.

थोडक्यात बातम्या – 

टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! ‘या’ कारणामुळे सलामीवीर KL Rahul संघाबाहेर

“कुणीतरी हिजाबच्या मागं जातंय, कुणीतरी… महत्त्वाचं काय? देश की धर्म?”

“संजय राऊत तुम्ही फक्त फडणवीसांच्या घराबाहेर याच, मग आम्ही बघू”

“शरद पवार साहेबांना माझा शब्द…”; जयंत पाटलांनी दिल्या ‘प्राॅमिस डे’च्या हटके शुभेच्छा

मोठी बातमी! राज्यमंत्री बच्चू कडू यांना 2 महिने कारावासाची शिक्षा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More