काँग्रेसचं तिकीट हवं असेल तर आता या तीन अटी पाळाव्याच लागणार!

भोपाळ | मध्य प्रदेशमध्ये भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेसचं तिकीट हवं असेल तर तिकीटावर दावा करणाऱ्यांना सोशल मीडियासंदर्भात 3 अटींचं पालन करावं लागणार आहे. ‘इंडिया टुडे’नं यासंदर्भात वृत्त दिलं आहे. 

1. उमेदवाराचे स्वतःचे फेसबुक पेज आणि ट्विटर अकाऊंट हवे. तसेच मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या आणि बूथ लेव्हल कार्यकर्त्यांच्या व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये समावेश असावा.

2. ट्विटरवर 5 हजार फॉलोअर्स आणि फेसबुक पेजला किमान 15 हजार लाईक्स हवेत. 

3. मध्य प्रदेश काँग्रेसच्या फेसबुक आणि ट्विटरवरील प्रत्येक पोस्ट शेअर आणि रिट्विट बंधनकारक आहे.

तिकीट मिळवण्यासाठी फक्त एवढ्याच अटी नाहीत. आणखी अटी आहेत, मात्र या अटी प्राधान्यांने पाहिल्या जाणार आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या-

-घरात लग्नाची तयारी सुरु असताना ‘आमदाराची नवरी’ गेली पळून

-20 वर्षांनी मोठ्या रवी शास्त्रीसोबत अफेअरची चर्चा; ‘एअरलिफ्ट’च्या अभिनेत्रीनं दिलं उत्तर

-…हे तर जनतेचं शोषण; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी सरकारला घरचा आहेर

-मनसे अध्यक्ष राज ठाकरे कुणाला घाबरतात?; स्वतःच दिलं उत्तर…

-डॉल्बी कोण बंद करतंय बघूच; खासदार उदयनराजेंनी आवाज वाढवला

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या