बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेसने मुस्लीमांचा फक्त वापर करुन घेतला; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

बंगळुरु |  काँग्रेसने मुस्लीमांचा फक्त वापर करुन घेतला आहे, असा गंभीर आरोप कर्नाटक काँग्रेसचे नेते रोशन बेग यांनी केला आहे. बंगळुरु येथे पत्रकार परिषद घेत त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने एकाही ईसाई व्यक्तीला उमेदवारी दिली नाही. तसेच कर्नाटकमध्ये त्यांनी फक्त एकाच मुस्लीम नेत्याला उमेदवारी दिली, असं ते म्हणाले आहेत.

काँग्रेसला मुस्लीम समाज फक्त निवडणुकांवेळी आठवतो. काँग्रेस आमचा फक्त वापर करुन घेत आली आहे, असं ते म्हणाले आहेत.

मुस्लीम समुदायाला गृहीत धरू नका. वेळ पडल्यास आम्ही भाजपलाही मदत करु शकतो, असंही ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

-महाराष्ट्रातील ‘या’ भाजप उमेदवाराला विजयाची पक्की खात्री; निकालापूर्वीच दिली मिठाईची ऑर्डर

-शहांकडून उद्धव ठाकरेंसाठी खास पुरणपोळीचा बेत; पण डीश सर्व्ह करायला जाणार हे शिवसेना नेते

-पुण्याच्या काँग्रेस उमेदवाराला ईव्हीएमवर शंका; म्हणून केली मतमोजणी केंद्राची पाहणी

एक्झिट पोलने वर्तवला निलेश राणेंचा पराभव; यावर नितेश म्हणतात…

-निवृत्तीनंतर काय करणार? धोनीने केला खुलासा…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More