बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेस स्वबळावरच लढणार, शब्द दिलाय, आता माघार नाही- नाना पटोले

जळगाव | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे जळगाव दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज कृषी कायद्याविषयीच्या प्रतिचे दहन केलं तसेच मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी स्वबळाचा पुनरुच्चार केला आहे.

काँग्रेस स्वबळावर लढणार, हा शब्द आम्ही दिला आहे, त्यात कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, निवडणुकांना अजून तीन वर्षे बाकी आहेत, अशा परिस्थितीत पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गैर नाही. कार्यकर्त्यांना स्वबळाचे आदेश दिले आहेत. आम्ही बोललो आहे, आता माघार घेणार नाही, असं नाना पटोले म्हणाले.

ओबीसी आरक्षण हटविण्याचे पाप हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे आहे. आता तेच जनतेची दिशाभूल करत आहेत, ओबीसी आरक्षण परत मिळवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही नाना पटोलेंनी दिली.

दरम्यान, नाना पटोले हे विदर्भ दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी स्वबळाची घोषणा केली होती. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढेल, असा पुनरुच्चार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमरावतीत केला होता. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली. तसेच पटोलेंच्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीत तणावाचं चित्र निर्माण झाल्याचं पहायला मिळालं.

थोडक्यात बातम्या- 

डेल्टा प्लसमुळे रुग्ण सीरिअस होण्याचं प्रमाण अधिक, तरी घाबरू नका- राजेश टोपे

“गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक वरचढ ठरले, आपले सैनिक पुरेसे प्रशिक्षित नसल्याची चीनला जाणीव”

देशात कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; बरे होणाऱ्यांची संख्याही वाढली

‘सरकारमध्ये ओबीसीविरोधात कट रचण्याचं षडयंत्र सुरुये’; ओबीसी नेते आक्रमक

आज ठरणार टेस्टचा बादशाह; राखीव दिवशी सामन्याची चुरस वाढली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More