Top News

नागपुरात गडकरींचा मी 5 लाखांहून अधिक मतांनी पराभव करणार; पटोलेंचा दावा

नागपूर |  संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघातून मी पाच लाखांच्या फरकाने निवडून येणार आणि नितीन गडकरींना पराभवाची धूळ चाखायला लावणार, असा दावा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे.

काँग्रेसला नागपुरातून मोठ्य़ा प्रमाणावर पाठिंबा मिळाला. त्यांचे मतरूपी आशीर्वाद त्यांनी मला दिले  आहेत. मला विश्वास आहे नागपुरातून मीच बाजी मारणार, असं पटोले म्हणाले आहेत.

विदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सर्वच्या सर्व म्हणजे 10 जागा मिळतील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.

एक्झिट पोलच्या संकेतांनंतर लोकांच्या मनात शंका निर्माण झाली असून निवडणुकांचे निकाल असेच एकतर्फी राहिले तर लोकांचा उद्रेक होईल, अशीही कमेंटही नाना पटोले यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

-बीडमध्ये बजरंग सोनवणे की प्रितम मुंडे?; ‘न्यूज18’च्या पोलनं वर्तवला अंदाज

-एक्झिट पोल लोकांच्या मनातील नाहीत- रोहित पवार

-अमित शहांकडून एनडीएच्या नेत्यांना दिल्लीत जेवणाचं निमंत्रण

-‘त्या’ ट्विटमुळे ट्रोल करणाऱ्यांना फरानचे सडेतोड उत्तर

-आम्ही मुर्ख नाही; करण जोहरला नेटकऱ्यांनी सुनावले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या