देश

राजस्थानच्या रामगडमध्ये काँग्रेसचा विजय; भाजपला चारली पराभवाची धूळ

जयपूर | राजस्थानातील रामगड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या साफिया जुबेर खान यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपच्या सुखवंत सिंह यांचा पराभव केला.

साफिया जुबेर खान यांना 83311 तर सुखवंत सिंह 71083 मतं मिळाली. साफिया खान यांनी मतमोजणीत सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती.

लोकसभा निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी या विजयामुळं आम्हाला बळ मिळेल, असं राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रामगडमध्ये बसपाचे लक्ष्मणसिंग उमेदवार होते, मात्र निवडणुकीपूर्वी त्यांचा मृत्यू झाल्यामुळे याठिकाणी पोटनिवडणूक झाली.

महत्वाच्या बातम्या-

मुख्यमंत्रिपदावर असेपर्यंत भ्रष्टाचार करत रहायचा का?,अण्णांचा सरकारला सवाल

-रोहित शेट्टीचा दिलदारपणा, ‘सिम्बा’च्या कमाईतील मोठा वाटा मुंबई पोलिसांना

-“राहुलजी, आजाराशी संघर्ष करणाऱ्याविषयी खोटं बोलण्याइतके तुम्ही असंवेदनशील”

-भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांचे प्रकाश आंबेडकरांना आवाहन

-धक्कादायक! जिल्हा परिषद शाळेतील खिचडीत निघाला साप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या