काँग्रेसच्या राजस्थान विजयात महाराष्ट्राच्या या सुपूत्राचं देखील मोठं योगदान!

मुंबई | राजस्थानातील काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार म्हणून सचिन पायलट यांच्याबरोबर महाराष्ट्रातील एक नाव असल्याचं समोर आलं आहे. अविनाश पांडे असं त्यांच नाव असून ते नागपूरचे रहिवासी आहेत. 

नागपूरमध्ये ते अविनाश भैय्या म्हणून परिचित आहेत. कितीही चढउतार आले तरीही त्यांनी काँग्रेस सोडली नाही.

गेली अनेक वर्षे ते अविरतपणे पक्षाचं काम करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते पक्षाच्या कामानिमित्त दिल्लीलाच असतात.

दरम्यान, अविनाश पांडे हे आखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि राजस्थान काँग्रेसचे प्रभारी आहेत. राजस्थानच्या विजयाचं श्रेय त्यांनाही दिलं जातंय.

महत्वाच्या बातम्या 

भाजप खासदार संजय काकडे पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर?, पवारांसोबत प्रवास केल्यानं एकच चर्चा

-ना हार मैं, ना जीत मै… शिवराज सिंहांनी वाजपेयी अंदाजात पराभव स्वीकारला

कदाचित आता तुम्हाला लोणावळ्याची ही प्रसिद्ध चिक्की खाता येणार नाही!

वादग्रस्त नगरसेवक श्रीपाद छिंदमचं विजयानंतर शिवरायांच्या चरणी लोटांगण

-हत्तीची दोन घरांची चाल; अन् मध्य प्रदेशच्या सत्तापटावर काँग्रेसचं भाजपला चेकमेट!