राजस्थानही भाजपच्या हातून जाणार??? वसुंधरा घरी बसण्याची शक्यता

जयपूर | राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होऊन काँग्रेस सत्तेवर येईल, अशी शक्यता विविध वाहिन्यांच्या एक्झिट पाेलमध्ये दर्शविण्यात आली आहे. 

इंडिया टुडे आणि अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेस 119-141 तर भाजपा 55-72 जागा मिळवेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. न्यूज नेशनच्या एक्झिट पोलचा भाजपला 108 -112 काँग्रेस ला 105-109 तर इतरांना 05-11 जागा मिळतील असा अंदाज आहे.

टाईम्स नाऊ – सीएनएक्स एक्झिट पोलनुसार भाजप 85 तर काँग्रेस 105 तर इतर पक्ष 10 जागांवर विजयी होतील असा अंदाज आहे. 

राजस्थानात गेल्या 25 वर्षांपासून कोणत्याही राजकीय पक्षाला दुसऱ्यांदा सत्ता मिळालेली नाही. यामुळं राजस्थान मध्ये इतिहासाची पुनरावृत्ती घडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-भाजपसाठी धोक्याची घंटा; मध्यप्रदेशमध्ये सत्ता जाणार?

-नरेंद्र मोदी तुघलक तर योगी आदित्यनाथ औरंगजेब; काँग्रेसची टीका

-शरद पवारांच्या गाडीचं सारथ्य केलं चक्क त्यांच्या नातीनं

-50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण नकोच – सर्वोच्य न्यायालय

-शरद पवारांचा गडकरींना प्रेमाचा सल्ला; म्हणाले तब्येतीला सांभाळा…