कल्याण । मुद्रा लोन मिळवून देते, असं आमिष दाखवून अनेक महिलांना गंडा घालणाऱ्या महिलेला शिवसेना महिला आघाडीने चांगला चोप दिला.
कल्याणमध्ये राहणारी शमीम बानो नावाची एक महिला ही स्टॅम्प वेंडरचा काम करते. ती काँग्रेस पक्षाची पदाधिकारी सुद्धा आहे. त्यामुळे अनेक महिला तिच्या संपर्कात येतात. तिने अनेकांना विविध प्रकारे गंडा घातला आहे. विशेष म्हणजे मुद्रा लोन मिळून देण्याचे आमिष दाखवून शमीमने अनेक महिलांकडून खूप पैसे उकळले आहेत. पण अखेर तिचं दुष्कृत्य महिलांच्या लक्षात आलं आहे.
लोन मिळाले नाही. तसेच गुंतवलेले पैसे मिळाले नाही म्हणून फसवणूक झालेल्या महिलांनी शिवसेनेच्या महिला आघाडी पदाधिकारी आशा रसाळ यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर या महिला शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांसोबत आज संध्याकाळी शमीम बानोला भेटण्यासाठी पोहोचल्या. शमीम बानोने या महिलांना उलटसूलट उत्तरे देण्यास सुरुवात केली. यानंतर संतप्त महिला आणि शिवसेना महिला आघाडीने शमीमला चांगला चोप दिला.
शमीम बानो हिच्या विरोधात यापूर्वी देखील काही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात कायदेशीर कारवाई केली जाईल, असे महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक नारायण बनकर यांनी सांगितले.
थोडक्यात बातम्या-
‘संजय राठोड हे ठाकरे सरकारमधील गजा मारणे’; ‘या’ भाजप नेत्याची गंभीर टीका
“महाराष्ट्राचे इरादे पक्के, पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाही”
धक्कादायक! साठ वर्षाच्या ‘या’ खासदाराने केलं 14 वर्षाच्या मुलीसोबत लग्न
चित्राताई ठेचतील या भीतीने नागोबा बाहेर आला- प्रसाद लाड
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शब्दाचे पक्के होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र लबाड”