बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महागाईविरोधात काँग्रेसचा एल्गार, सलग 10 दिवस राज्यव्यापी आंदोलनांचा भडका

मुंंबई | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षात सातत्याने आरोप प्रत्यारोपाची खेळी चालूच आहे. दोन्ही बाजूचे नेते एकमेकांना टार्गेट करण्याचा एकही मुद्दा सोडत नाहीत. अशातच आता महागाईच्या मुद्यावरुन काँग्रेसने भाजपला धारेवर धरलं आहे. मोदी सरकारने केलेल्या कृत्रिम महागाईच्या विरोधात काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी याबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले की, मोदी सरकारच्या काळात महागाईने लोकांचे जगणे कठीण केलं आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, डाळी, खाद्यतेलांच्या  किंमती सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत.

मोदी सरकारने निर्माण केलेल्या या महागाईविरोधात काँग्रेस आता राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. 8 जुलैपासून पुढील दहा दिवस विविध आंदोलनाच्या रुपाने मोदी सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला जाईल, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.

दरम्यान, उद्या नाना पटोले यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये काँग्रेस पक्ष सायकल यात्रा काढून इंधन दरवाढीविरोधात केंद्र सरकारचा निषेध नोंदविणार आहे. या सायकल यात्रेत पटोले यांच्यासह उर्जामंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार हे देखील सहभागी होणार आहेत.

थोडक्यात बातम्या – 

ईडी लावाल तर सीडी लावेल म्हणणाऱ्या नाथाभाऊंनाही ईडीची नोटीस???

प्रकाश जावडेकर यांचा राजीनामा का घेण्यात आला?; वाचा सविस्तर वृत्त

“बारा वर्षात काँग्रेसला राणेंची किंमत काय आहे कळलं नाही ते भाजपच्या नेतृत्वाला कळलं”

सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, उच्चांकी दरापेक्षा 8500 रुपयांनी स्वस्त; वाचा ताजे दर

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणेंनी सर्वप्रथम घेतली शपथ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More