बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादी-शिवसेना युतीबाबत संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

मुंबई  | दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या युतीबाबत वक्तव्य केलं होत. यावरून राज्यात चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे. अशातच संजय राऊत यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी काल 17 जून रोजी एक बैठक घेतली. मात्र त्यावेळी बैठकीत स्वबळावर निवडणूक लढण्याबाबत चर्चा झाली नसल्याचं ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात सांगितलं आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

विधानसभा निवडणुकीला साडे तीन वर्षे असल्याचंही त्यांनी म्हटलं. तसेच भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे यासाठी आम्ही महाविकास आघाडीत एकत्र आहोत. जनतेसाठी काम करतो हे समोर ठेवून पुढे काम करू, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. एच. के. पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काँग्रेसचे सर्व मंत्री उपस्थित होते.

दरम्यान, भाजप आणि काँग्रेस पक्ष स्वबळाची भाषा करत आहेत. मात्र शिवसेना आणि काँग्रेसने स्वबळाची भाषा केलेली नाही. त्यामुळे भविष्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले आणि निवडणूक लढले तर राज्यात चमत्कार होईल, असं संजय राऊत म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या-

“नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळत असल्यास माझ्या शुभेच्छा आहेत, पण…”

नरेंद्र मोदींचा जगात गाजावाजा, बायडन यांनाही मागे टाकलं, लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अव्वलस्थानी!

“माझ्या इतक्या चौकश्या झाल्या, तो राजकीय विषय नव्हता तर हा कसा असेल?”

400 फूट खोल दरीत कोसळली कार, पुढे जे घडलं ते ऐकून तुम्हीही व्हाल चकीत

ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार- विजय वडेट्टीवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More