Top News राजकारण शेती

केंद्राच्या शेतकरी कायद्याविरोधात काँग्रेसचा 31 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी सत्याग्रह

मुंबई | शेतकरी कायद्याविरोधात 31 ऑक्टोबरला काँग्रेसकडून राज्यव्यापी सत्याग्रह करण्यात येणार आहे. शेतकरी कायद्याविरोधातील हा पुढचा टप्पा असणार आहे. केंद्रातील भाजप सरकारने आणलेले अन्यायी शेतकरी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसने आंदोलन आणखी तीव्र केलंय.

31 ऑक्टोबर रोजी राज्यभरात ‘किसान अधिकार दिवस’ पाळला जाणार असून वर्ध्यातील सेवाग्राम येथे सत्याग्रहाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. शेतीविषयक या काळ्या कायद्यांविरोधात सत्याग्रह करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलीये.

बाळासाहेब थोरात म्हणाले, “केंद्र सरकारने विरोधी पक्षांची मतं विचारात न घेता पाशवी बहुमताच्या जोरावर हे कायदे मंजूर करुन घेतलेत. या कायद्यांमुळे उद्योपतींचं हित होणार असून शेतकरी मात्र देशोधडीला लागणार आहे.”

शेतकऱ्याला या कायद्याच्या माध्यमातून उद्योगपतींचा गुलाम बनवण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरली असून हे काळे कायदे रद्द होईपर्यंत आमचा संघर्ष सुरुच राहणार असल्याचंही थोरात यांनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-

“…तरी देखील मी माझ्या मुलाच्या वतीने महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागते”

“अतिवृष्टीच्या मदतीमध्ये वाढ करावी, अन्यथा सरकारला हादरवणारे आंदोलन करु”

“सुनील तटकरेंना आलेला सत्तेचा माज आगामी काळात जनताच उतरवेल”

“त्यांना वाटलं की संधी आली अशोक चव्हाणला ठोका, पण…”

एक बाप म्हणून मी माफी मागतो, मुलगा 27 वर्षांपासून माझ्यासोबत नाही- कुमार सानू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या