स्वतःला वाचवण्यासाठी मोदींनी सर्वोच्च न्यायालयाला फसवले- काँग्रेस

नवी दिल्ली |मोदी सरकारने आजपर्यंत जनतेला फसवण्याचे अनेक उद्योग केले. आता मात्र ते थेट सर्वोच्च न्यायालयाला फसवत आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार अभिषेक मनू सिंहवी यांनी केला आहे.

राफेल प्रकरणात सरकारने सर्वोच्च न्यायालयात खोटी कागदपत्रं सादर करुन न्यायालयाची फसवणूक केली आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

कॅगकडे राफेल प्रकरणात कागदपत्रं दाखल झाले नसताना, याप्रकरणी न्यायालयात खोटं का बोलण्यात आलं, असा सवालही त्यांनी केला आहे.

सरकारने न्यायालयाला बंद लिफाफ्यात सादर केलेली माहिती खोटी होती. बंद लिफाफ्यात खोटी माहिती सादर करणे गुन्हा आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या –

-शिवसेना-भाजप एकत्र आले तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन सरकेल!

-कोण होणार अहमदनगरचा महापौर?; शिवसेनेचे रामदास कदम ठरवणार…

-लोक भाजपकडून पैसे घेतील पण मत देणार नाहीत- राज ठाकरे

-काश्मीरात रक्तपात; 7 नागरिक, 3 अतिरेकी आणि 1 जवान शहीद

-“चूक असेल तर मराठी माणसांनाही ठोकून काढेन”!