काँग्रेस हाच भाजपला पर्याय- शरद पवार

मुंबई |5 राज्यांच्या विधानसभेच्या निकालावरुन मतदार भाजपवर नाराज आहेत हे स्पष्ट झालं आहे. भाजपला पर्याय म्हणून काँग्रेस उभा ठाकला आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

शरद पवार यांच्या 78 व्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

काँग्रेसनं नविन पिढीकडे नेतृत्व सोपवलं. ते जनतेनं स्वीकारलं आहे. तसेच सार्वत्रिक निवडणुकीत तिसरी आघाडी किंवा यूपीए 3 असं काही नसेल, असं त्यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, देशपातळीवरील समस्यांसाठी सर्व पक्षांनी आपापसातील मतभेद विसरुन एकत्र यायला हवं, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या 

-शुभमंगल सावधान… ईशा अंबानी आणि आनंद पिरामल विवाहबंधनात

-शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय होणार?; सपाटून मार खाल्ल्यानंतर मोदींचा कमबॅक फॉर्म्युला

-भावुक झाले शिवराज सिंह; म्हणाले काही चूक झाली असेल तर माफ करा

-पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव झाल्यामुळं ढसाढसा रडतो हा मुलगा

-भाजपाच्या शेवटाची सुरुवात झाली आहे- छगन भुजबळ