बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

35 हजार लसी पडुन असल्याने ‘या’ महापालिकेचा लसीकरण सर्वांना सक्तीचं करण्याचा विचार

औरंगाबाद | संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातल्यानंतर अखेर कोरोना लसीचा शोध लागला आणि भारतामध्येही कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरूवातीच्या काळात नागरिकांनी कोरोना लस घेण्यासाठी टाळाटाळ केली. पण त्यानंतर नागरिक लस घेण्यासाठी पुढे येत असल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, महाराष्ट्रातही देशातील सर्वात जास्त लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. त्यातच काही नागरिक लसीकरण करून घेण्यासाठी पुढे येत नसल्याने औरंगाबाद महानगरपालिकेने एक मोठा निर्णय घेण्याचा विचार सुरू केला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल 35 हजार कोरोना लसी पडून असल्याचं समोर आलं आहे.

लसी पडून राहत असल्याने औरंगाबाद महानगरपालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांनी सर्व नागरिकांना लसीकरण सक्तीचं करण्याचा विचार सुरू असल्याचं बोलून दाखवलं आहे. नागरिकांनी लसीकरणासाठी पाठ फिरवल्याने प्रशासनाच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

लसीकरणाची टक्केवारी औरंगाबादमध्ये वाढत नसल्याने महानगरपालिका लसीकरण सक्तीचे करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता तरी लोक स्वतः पुढाकार घेऊन लसीकरण करून घेण्यासाठी पुढे येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

‘नवरा बायको भांडतात… नंतर एकत्र चहा पितात’; सेना-भाजप राड्यावर पाटलांचं सूचक वक्तव्य

शाळा सोडल्याचा दाखला नसेल तरीही मिळणार शाळेत प्रवेश; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

‘यू आर दी मोस्ट ॲक्टिव्ह मेयर’ म्हणत राज्यपालांनी केलं ‘या’ महिला महापौरांचं कौतुक

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता अशाप्रकारे 4000 रुपये मिळवता येणार; वाचा सविस्तर

“12 सदस्यांची नियुक्ती मार्गी लावून राज्यपालांनी वाढदिवसानिमित्त राज्याला गोड भेट द्यावी”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More