बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लहान मुलांसाठी महत्त्वाची बातमी ! पुण्यात ‘या’ लसीची ट्रायल सुरू

पुणे | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तर मृत्यूचा तांडवच पहायला मिळाला होता. आता ही लाट हळूहळू ओसरत चालली आहे. मात्र तरीही तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. कोरोनाला संपवण्यासाठी एकमेव शस्त्र म्हणजे लसीकरण असल्यामुळे लसीकरणावर भर दिला जात आहे. आता तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता लहान मुलांचंही लसीकरण करणं गरजेचं झालं आहे.

भारतात 2 ते 18 वर्षाच्या मुलांवरील कोरोना लसीच्या ट्रायलला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच लहान मुलांनाही लस देण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. यातच आता पुण्यात लहान मुलांच्या लसीची ट्रायल सुरु करण्यात आली आहे.

पुण्यातील भारतीय विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात कोवोव्हॅक्स लसीच्या 2/3 टप्प्यांची ट्रायल सुरु झाली आहे. पुण्यात होणारं हे ट्रायल 7 ते 11 वर्षाच्या मुलांवर होणार आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी आतापासूनतच घेतली जात आहे. त्यामुळे लसीकरणावर देखील भर दिला जात आहे.

दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत अनेक राज्यांमध्ये लहान मुलांसाठी रुग्णालय उभारणार आहे. त्याचं कामही सुरु केलं आहे. सध्या कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे.

थोडक्यात बातम्या – 

“चंद्रकांत पाटलांनी 15 डिसेंबरची मुदत दिली होती, म्हणजे 6 महिने…”

प्रा. दत्तात्रय चव्हाण यांना अर्थशास्त्र विषयात Ph.D.पदवी

मान्सून हंगाम संपला! ‘या’ तारखेपासून सुरू होणार परतीचा पाऊस

“मी अजूनही काँग्रेससोबतच, सध्या तरी पक्ष सोडण्याचा विचार नाही”

…अन् 7 सेकंदात 7 मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More