देश

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णव गोस्वामींना दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला झापलं!

नवी दिल्ली | अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं रिपब्लिक टीव्ही संपादक अर्णव गोस्वामी यांना दिलासा देत राज्य सरकारला झापलं आहे.

राज्य सरकार काही व्यक्तींना निशाण्यावर ठेऊन त्यांच्यावर कारवाई करणार असेल, तर त्यांनी सर्वोच्च न्यायालय नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण करेल, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं आहे.

फौजदारी कायद्याचा वापर नागरिकांचं शोषण करण्यासाठी करता येणार नाही, एखाद्या नागरिकाला एक दिवसही स्वातंत्र्यापासून वंचित ठेवणं खूप आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय.

सत्र न्यायालयांपासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्व न्यायालयांनी नागरिकांचं मुलभूत हक्काचं संरक्षण केलं पाहिजे. नागरिकांच्या स्वातंत्र्यांचा संकोच होत असेल तर नागरिकांच्या स्वांतत्र्यांचं सरंक्षण करणं न्यायालयाचं काम असल्याचं, सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘कंगणाविरोधातील कारवाई सूडबुद्धीने’; उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटकारलं

स्मिथ आणि फिंचची दमदार शतकं; ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर 375 धावांचं खडतर आव्हान

प्रताप सरनाईक प्रकरणासंदर्भात ईडीने केला मोठा खुलासा

राज्यातील सध्याचे सरकार लवकरच कोसळेल कारण…-राम शिंदे

महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांपेक्षा जास्त चालणार- अनिल देशमुख

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या