बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतीयांची चिंता मिटली! Omicronबाबत दिलासादायक माहिती समोर

नवी दिल्ली | ओेमिक्रॉन व्हेरीयंटने (Omicron varient)  पु्न्हा एकदा सर्वच देशांची चिंता वाढवली आहे. नुकतचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) देशवासीयांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. जानेवारीत तिसरी लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहेत. त्यातच आता दक्षिण आफ्रिकेतून ओमीक्रॉनबाबत एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.

उद्योगपती हर्ष गोयंका यांनी ट्विट करून हि दिलासादायक माहिती सांगितली आहे. दक्षिण आफ्रिकेतील ओमिक्रॉनचा संसर्ग होणाऱ्या रुग्णांची संख्या वेगाने होत आहे. रुग्ण रूग्णालयात दाखल होत आहेत. मात्र, ज्या नागरिकांनी लसीचा एकच डोस घेतला आहे. किंवा ज्या लोकांनी लसच घेतली नाही. अशा नागरिकांनाच ओमिक्रॉनचा संसर्ग होत असल्याची माहिती गोयंका यांनी दिली आहे.

हर्ष गोयकां यांनी दिलेल्या माहितीमुळे भारतालाही दिलासा मिळाला आहे. हर्ष गोयकां यांनी ही माहिती शेअर करतानाच एक चार्टदेखील शेअर केला आहे. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेतील रुग्णांची घटत्या संख्येचा आलेख आहे.

दरम्यान,  ओमिक्राॅनचा वाढता संसर्ग पाहता 2 दिवसांपूर्वी नरेंद्र मोंदीनी देशाला संबोधित केलं आहे. ओमिक्राॅनला घाबरुन जाण्याची काही गरज नाही, फक्त काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज असल्याचं मोदींनी म्हटलं होतं. 16 जानेवारी पासून लसीकरण सुरू केलं होतं. आतापर्यंत 141 कोटी लोकांचं लसीकरण झाला आहे. त्यामुळे देशानं लसीकरणाचा चांगला टप्पा पार केला आहे, असंही ते म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘…तो कुत्रा म्हणजे भास्कर जाधव’, विधानसभेत पुन्हा एकदा राडा

इतका अभ्यास बरा नाही, त्याचं ओझं राज्यपालांना झेपलं पाहिजे- संजय राऊत

“…तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते”

अधिवेशनात कोरोनाचा कहर, ‘इतक्या’ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर

‘मोहनदास करमचंद गांधीनी सत्यानाश केला’; कालीचरण महाराजाचं संतापजनक वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More