बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! महाराष्ट्रात आज कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद

मुंबई | गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रभर हाहाकार माजवल्याचं चित्र पाहायला मिळालं. वाढत्या रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेवरही मोठ्या प्रमाणात ताण आला आणि परिणामी अनेकांना उपचाराअभावी आपला प्राण गमवावा लागला. परंतु, आता महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ही हळूहळू आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र आहे.

आज महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. आज महाराष्ट्रात 6 हजार 270 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच 13 हजार 758 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 94 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 59 लाख 79 हजार 51 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 57 लाख 33 हजार 215 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्रात 1 लाख 24 हजार 398 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, गेल्या काही महिन्यात वाढणारी रुग्णसंख्या ही कमी झाल्याने महाराष्ट्रात दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनलॉकला देखील सुरुवात झाली आहे. अशीच रुग्णसंख्या कमी होत राहिली तर महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल.

थोडक्यात बातम्या – 

शेतकरी आंदोलन अधिक तीव्र होणार, राकेश टिकैत यांचं शेतकऱ्यांना आवाहन

“शरद पवार भाडोत्री चाणक्याची भेट घेतात याचा अर्थ त्यांच्या राजकारणाचा अस्त”

कोरोनामुळे यंदाही अमरनाथ यात्रा रद्द; ‘या’ दिवसापासून घेता येणार ऑनलाईन दर्शन

बच्चू कडूंचा गनिमी कावा! वेशांतर करुन शासकीय कार्यालयात गेले अन्…

मराठा आंदोलनावर खासदार संभाजीराजे यांची मोठी घोषणा, म्हणाले….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More