बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राहुल गांधींना ट्विटरकडून दिलासा; आठवड्याभरानंतर अकाऊंट अनलाॅक

नवी दिल्ली | गेल्या आठवड्यात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट ट्विटरने लाॅक केलं होतं. त्यानंतर ट्विटरने कारवाईचा सपाटाच लावला होता. ट्विटरने आणखी मोठी कारवाई करत काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर देखील कारवाई केली होती. तर ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधींच्या समर्थात ट्विट केलं अशा नेत्याना देखील ट्विटरने दणका दिला होता. त्यानंतर आता लाॅक करण्यात आलेले सर्व अकांऊट अनलाॅक करण्यात आले आहेत.

मागील आठवड्यात राहुल गांधी यांनी अत्याचार पिडीत कुटूंबाची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी त्याचा फोटो ट्विटवर शेअर केला होता. हा फोटो नियमबाह्य असल्याचा दावा करत ट्विटरने राहुल गांधी यांचं अकांऊट लाॅक केलं होतं. राहुल गांधी यांचं अकाऊंट लाॅक केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांचं अकाऊंट अनलाॅक करण्याची मागणी केली होती. तर केंद्र सरकारच्या दबावामुळे ट्विटरने कारवाई केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.

त्यानंतर काँग्रेस पक्षाचं अधिकृत ट्विटर अकाऊंट देखील लाॅक करण्यात आलं. त्याचबरोबर काँग्रेसच्या काही नेत्यांंचं देखील अकाऊंट लाॅक केलं गेलं. त्यानंतर आता आठवड्याभराने राहुल गांधी, काँग्रेसचं अधिकृत अकाऊंट आणि नेत्याचं अकाऊंट पुन्हा सुरू करण्यात आलंं आहे. मागील काही दिवसांत ट्विटरने मोठ्या कारवाई करत 50 हजारांहून अधिक नेटकऱ्याचं अकाऊंट लाॅक केलं आहे. नवीन आयटी कायद्याचं पालन करताना ही कारवाई केल्याच्या चर्चा आहेत.

दरम्यान, ट्विटर पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. ट्विटरने माझं अकाऊंट बंद करून भारताच्या राजकीय प्रक्रियेत हस्तक्षेप करत आहेत, असा आरोप देखील त्यांनी केला होता. कंपनीचं धोरण मला एक राजकारणी नेता म्हणून मान्य नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या-

11वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; आजपासून प्रवेश प्रक्रिया सुरू, वाचा सविस्तर

“राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी राजकारणातलं प्यादं बनू नये”

बाहेरून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; सरकारने घेतला मोठा निर्णय

रानडे इंस्टिट्यूटच्या स्थलांतराला अखेर स्थगिती; विद्यार्थ्यांच्या मागणीला मोठं यश

कोरोना लढ्यात आणखी एक लस उपलब्ध; आता नाकातून घेता येणार लस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More