बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आंबिल ओढा परिसरातील नागरिकांना दिलासा; न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश

पुणे | पुण्यातील आंबिल ओढा परिसरात आज सकाळपासूनच अतिक्रमण असलेल्या घरांवर महापालिकेच्या कारवाईला सुरुवात झाली होती. या कारवाईमुळे स्थानिक नागरिक विरुद्ध प्रशासन व पोलिस असा मोठा वादही पेटल्याचं चित्र पाहायला मिळालं. दरम्यान, याप्रकरणी काही स्थानिक नागरिकांनी आत्मदहनाचा प्रयत्नही केला होता.

पोलीस व नागरिकांमध्ये मोठा वाद झाला व या प्रकरणाची दखल थेट नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेत आज सकाळी बैठक देखील बोलावली होती. या सर्व प्रकरणात न्यायालयाने स्थानिक नागरिकांना दिलासा दिला आहे. हे सर्व प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर या लोकांच्या पुनर्वसन करण्यासाठी कोणतीही माहिती न्यायालयासमोर उपलब्ध करण्यात आली नसल्यामुळे या लोकांना घरातून बेघर करणं चुकीचं असल्याचं मत व्यक्त करत ही कारवाई तात्काळ थांबवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान, पुणे महानगरपालिकेकडून नागरिकांच्या घरावर आज सकाळपासूनच ही कारवाई करण्यात येत होती. यामुळे आंबिल ओढा परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झाल्याचं दिसून आलं. आंबिल ओढा परिसरात तब्बल 130 घरांवर ही कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. परंतु, यापैकी बर्‍याचशा घरांवर महापालिकेचा बुलडोझर फिरलेला आहे. त्यामुळे अशा नागरिकांची आता तात्काळ स्वरूपात कुठे राहण्याची व्यवस्था केली जाईल? हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.

आंबिल ओढा परिसरात स्थानिक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने व काही लोकांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी कारवाई करत अनेकांना ताब्यात घेतलं व उपस्थित नागरिक हे या कारवाईला विरोध करत असताना पोलिसांकडून त्यांना थांबवण्यात येत होतं. तर ही कारवाई बिल्डरकडून होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तात्काळ या प्रकरणात कारवाई थांबवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर पुढील आदेशापर्यंत ही कारवाई स्थगित राहणार आहे.

थोडक्यात बातम्या –

बारावीच्या परीक्षा घेऊन तुम्हाला काय वेगळं सिद्ध करायचंय?; सर्वोच्च न्यायालयाने खडसावलं

“काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकेल असं वाटत नाही”

“ओबीसी नेत्यांचं नेतृत्व संपवताना हा कळवळा कुठे गेला होता?”

डेल्टा प्लस व्हेरिएंटनं टेंशन वाढवलं; राज्यातील निर्बंध पुन्हा कडक होण्याची शक्यता

‘विमानतळाला बाळासाहेबांचं नाव देणं हा उद्धव ठाकरेंचा बालहट्ट’; भाजप नेत्यांसोबत मनसे आमदार मैदानात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More