बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आयकर विभागाने घेतले हे तीन मोठे निर्णय, वाचा काय आहेत?

नवी दिल्ली | सामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी, आयकर विभागाने तीन मोठे निर्णय घेतले आहेत. सरकारने पॅन कार्ड बायोमेट्रिक आयडी आधारशी लिंक करण्याची मुदत वाढवली आहे. तसेच  सरकारने थेट कर निराकरण योजना ‘विवाद से विश्वास’ अंतर्गत पेमेंटची तारीखही वाढवली आहे.

आयकर खात्याने पॅन कार्डधारकांना त्यांचे पॅन आधार कार्डाशी वेळेत जोडण्यास सांगितलं आहे, अन्यथा त्यांचे पॅन निष्क्रिय केले जाईल. जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल, पण ते आधारशी लिंक नसेल तर ते अवैध ठरवले जाईल आणि त्याचा काही उपयोग होणार नाही.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची आधार योजना घटनात्मक वैध म्हणून घोषित केली होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैध पॅन कार्डशिवाय रिटर्न भरणं देखील शक्य नाही.

दरम्यान, बेनामी मालमत्ता व्यवहार रोखण्याबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संकटामुळे या सर्व गोष्टींसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या- 

बाॅयफ्रेंडने गर्लफ्रेंडसाठी बनवले अजब नियम, वाचून तुम्हालाही बसेल धक्का!

एटीएस आणि क्राईम ब्रांचची मोठी कारवाई; जोगेश्वरीतून एक संशयित दहशतवादी ताब्यात

कोरोना झाल्यावर कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एवढ्या’ दिवसांची सुट्टी, सरकारनं घेतला मोठा निर्णय!

“मोदींचा चेहरा नसेल तर नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकांतही पराभूत होतील”

“विकासाच्या नावावर उद्धव ठाकरे औरंगाबादकरांना उल्लू बनवू शकत नाही”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More