बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणेकरांना दिलासा; आजपासून आणखी नियम शिथिल होणार, वाचा नव्या गाईडलाईन्स

पुणे | पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुणे महापालिकेने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्यानुसार पुण्यातील मॉल, अभ्यासिका, ग्रंथालय 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. तसेच व्यायामशाळा, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा, कोचिंग क्लासेस आदी गोष्टी अटीशर्थींसह सुरु करण्यात येणार आहेत.

पुण्याच्या शहरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने त्याठिकाणी सरसकट दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. या दुकानांसाठी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंतची वेळ ठरवून देण्यात आली आहे. पुण्यातील पीएमपी बससेवाही आजपासून 100 टक्के क्षमतेने सुरु होणार आहे. सार्वजनिक बस वाहतूक सुरु झाल्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नवीन नियमावलीनुसार पुण्यात संध्याकाळी 7 पर्यंत सर्व प्रकारची दुकाने सुरु राहणार असून मॉल, मल्टिप्लेक्स सिनेमागृह आणि थिएटर हे मात्र बंद असणार आहे. शहरातील विकेंड लॉकडाऊन मात्र कायम ठेवण्यात आला आहे. शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहे.

पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट हा 5.16 टक्के इतका असल्यामुळे पुणे शहराचा तिसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला होता. आणि या टप्प्यातील निर्बंधांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील पुण्यातील कोरोना आढावा बैठकीत निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

थोडक्यात बातम्या- 

जगभर थैमान घातलेल्या कोरोना मातेचं मंदीर जमीनदोस्त

दिलासादायक! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात आज एकाही कोरोना रूग्णाचा मृत्यु नाही

महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांची संख्या 10 हजारांच्या घरात; पाहा दिलासादायक आकडेवारी

जबरदस्त! अखेर सांगलीच्या ‘या’ कंपनीला मिळाली कोरोना इंजेक्शनच्या मानवी चाचणीची परवानगी

‘…म्हणून महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल आहे ‘; पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा खुलासा

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More