बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोनं खरेदी करणाऱ्यांना दिलासा; वाचा आजचा सोने-चांदीचा ताजा भाव

मुंबई | महिला मंडळींसाठी सोनं (Gold) हे खूप जवळची गोष्ट असते. त्यामुळे आपल्या भारत देशात सोन्याला खूपच महत्त्व आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या दागिन्यांना. त्यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये दररोज चढ-उतार आपल्याला पाहायला मिळतं असतो.

एक चांगली आणि उत्तम गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी केलं जातं. त्यामुळे सोन्याच्या भाव नेगमीच गरम पहायला मिळतो. अशातच आज गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,300 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 48,300 प्रति 10 ग्रॅम आहे.

सणासुदीच्या मुहुर्तावर गुंतवणुकदारांसाठी सध्या सोनं खरेदी करण्याची चांगली संधी आहे. अशातच आता आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात मोठी घसरण अनुभवायला मिळाली होती.

दरम्यान, सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

थोडक्यात बातम्या – 

धक्कादायक! Omicronपासून वाचण्यासाठी आता एका व्यक्तीला मिळणार ‘इतके’ डोस

मस्तच ना! आंतराळातील हेअर कटिंग, पाहा व्हायरल व्हिडीओ

Omicronच्या धास्तीनं राज्यात नवे निर्बंध, आजपासून नवे नियम लागू

मुस्लीम आरक्षणावरून इम्तियाज जलील-नवाब मलिक आमने सामने

कुसुमाग्रजांची कविता, बाळासाहेबांची आठवण अन् फडणवीसांनी लगावला मुख्यमंत्र्यांना टोला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More