देश

भारताच्या चहाची बदनामी करण्यासाठी परदेशातून षडयंत्र रचलं जातंय- नरेंद्र मोदी

दिसपूर | भारताच्या चहाला बदनाम करण्यासाठी परदेशातून मोठं षडयंत्र रचलं जात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आसाममधील एका सभेत बोलत होते.

काही कागदपत्रं समोर आली आहेत. यानुसार परदेशातील काही लोक चहाला आणि लोकांच्या त्याच्यासोबत असलेल्या नात्याला बदनाम करण्याचा कट रचत आहेत, असं मोदींनी सांगितलं आहे.

प्रत्येकाला उत्तर द्यावं लागेल. जे लोक मौन राहून चहाला बदनाम करणाऱ्या परदेशींना मदत करत आहेत त्यांना देखील यावर उत्तर द्यावं लागेल, असं नरेंद्र मोदींनी म्हटलंय.

दरम्यान, कट रचणाऱ्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांना भारताच्या चहाला बदनाम करता येणार नाही, असंही मोदी म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“बाळासाहेब ठाकरेंचे सर्व सिद्धांत तापी नदीत टाकून शिवसेना सत्तेत आली”

शेतकरी आंदोलनावर मिया खलीफाचं पुन्हा ट्विट, म्हणाली…

“वचन दिलं नव्हतं हे सांगायला सव्वा वर्ष लागलं?”

मृत्यूच्या दाढेतून त्याला जवानांनी सुखरुप बाहेर काढलं, पाहा व्हीडिओ

…तोपर्यंत महाविकासआघाडी सरकारला काहीच होऊ शकत नाही- अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या