बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सावरकरांना बदनाम करण्याचं कारस्थान सुरू आहे, आता सावरकरांचं युग येतंय”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत हिंदू धर्मावर प्रखरतेने आपलं मत मांडताना दिसत आहेत. अशातच आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मोहन भागवत यांनी एक सावरकर यांच्याविषयी वक्तव्य केलं आहे. सावरकरांना बदनाम करण्याचं कारस्थान सुरू असल्याचं मोहन भागवतांनी म्हटलं आहे.

सावरकर आणि आरएसएसवर टीका केली जातीये. येत्या काळात स्वामी विवेकानंद, दयानंद आणि स्वामी अरविंद यांचा नंबर येईल, असं भागवत म्हणाले आहेत. भारताला जोडल्याने ज्याचं दुकान बंद होईल, त्यांना हे चांगलं वाटलं नाही. जोडण्याच्या विचाराला धर्म म्हटलं जातं. यालाच मानवता आणि संपूर्ण जगाची एकता म्हटलं जातं. याला सावरकरांनी हिंदूत्व म्हटलं आहे, असं भागवत म्हणाले आहेत.

सावरकरांचे हिंदूत्व आणि विवेकानंदांचे हिंदूत्व असं म्हणण्याची आता फॅशन झालीये. पण हिंदूत्व हे एकच आहे. ते आधीपासून एकच आहे आणि पुढेही एकच असेल, असंही मोहन भागवत म्हणाले आहेत.  काही लोकांच्या म्हणण्यानूसार 2014 नंतर सावरकर युग येत आहे, ते बरोबरच आहे. ज्यात सर्वांची जबाबदारी आणि भागेदारी असेल तेच हिंदूत्व आहे, असंही भागवत म्हणाले आहेत.

दरम्यान, आपल्या देशात मुले आणि मुली इतर धर्मात कसे काय जातात?, लग्नासाठी अन्य धर्मात धर्मांतर करणारे हिंदू लोकं मोठी चूक करत आहेत, असं मोहन भागवत यांनी याआधी म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या-

‘…म्हणून उदयनराजेंची ही सगळी नौटंकी सुरू आहे’; शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, जाणून घ्या आजची आकडेवारी

तरुणांना तिशीतच का येतोय हार्टअटॅक?, महत्त्वाची कारणं आली समोर

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More