निलंग्यात रामदास आठवलेंच्या उपस्थितीत संविधान सन्मान सभा!

निलंगा | निलंगा विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांच्या प्रचारार्थ दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत ठीक 10:00 वाजता संविधान सन्मान सभेचे आयोजन करण्यात आलं आहे.

या कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमचे उदघाटक म्हणून माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar), तर अध्यक्ष म्हणून माजी खासदार सुनील गायकवाड, राहणार आहेत.

रामदास आठवलेंच्या उपस्थितीत संविधान सन्मान सभा

प्रमुख पाहुणे म्हणून, इंजि, विश्वजित गायकवाड, भाजप अनु सूचित मोर्चा अध्यक्ष, संतोष वाघमारे,माजी जि .प सदस्य सौ कुसुमताई हलसे, हनुमान जाकते, आर.पी.आय,जिल्ह्या उपाध्यक्ष अंकुश ढेरे, दिलीप गायकवाड, धम्मानंद काळे,एन .डी सोनकांबळे, देविदास कांबळे, आदी नेते उपस्थित राहणार आहेत.

संभाजी पाटील निलंगेकर विरूद्ध अभय साळुंखे

दरम्यान, निलंगा विधानसभा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार आणि उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांची थेट लढत आता काँग्रेसचे उमेदवार अभय साळुंखे यांच्याशी होणार आहे.

2019 मध्ये निलंगा विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने जिंकला होता. या मतदारसंघातून 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाचे संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर हे विजयी झाले होते. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा 32131 मतांनी पराभव केला होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘चंद्रकांत पाटलांसारख्या सुसंस्कृत व्यक्तीला निवडून द्या’; माजी मंत्री सुरेश प्रभूंचं कोथरूडकरांना आवाहन

‘या’ सुप्रसिद्ध सिंगरचा बाथरूममधला व्हिडीओ तूफान व्हायरल!

राष्ट्रवादी अजित पवार गटाला धक्का; अजितदादांच टेन्शन वाढलं

महाविकास आघाडीची सत्ता आल्यास लाडक्या बहिणींना ‘इतके’ पैसे मिळणार!

राजकारण ‘या’ भाजीसारखं झालं आहे… बड्या नेत्यानी सर्वच पक्षांना घेरलं!