Constitution Murder Day | केंद्रातील मोदी सरकारने देशात आणीबाणी जाहीर केलेला दिवस ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून घोषित केला आहे. सरकारच्या या निर्णयावरून कॉँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त करत जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यासंदर्भातील एक्सवर पोस्ट करून (Constitution Murder Day) माहिती दिली आहे.
“25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हुकूमशाही मानसिकतेचे लाजिरवाणे प्रदर्शन करून देशावर आणीबाणी लादून आपल्या लोकशाहीच्या आत्म्याचा गळा घोटला. कोणताही दोष नसताना लाखो लोकांना तुरुंगात टाकण्यात आले आणि माध्यमांचा आवाज बंद करण्यात आला. भारत सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिवस’ (Samvidhaan Hatya Diwas) म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे. हा दिवस 1975 च्या आणीबाणीच्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या सर्वांच्या मोठ्या योगदानाचे स्मरण करेल.”, असं अमित शाह यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
25 जून ‘संविधान हत्या दिन’ म्हणून घोषित
या निर्णयावरून (Constitution Murder Day) आता कॉँग्रेससह इतर पक्षांकडूनही जोरदार टीका केली जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही भाजपला टार्गेट केलं आहे. ” हा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय होता, काही लोक देशात बॉम्ब बनवत होते आणि ठिकठिकाणी बॉम्बस्फोट करत होते. त्यामुळं अशा परिस्थितीत अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असते तर त्यांनीही आणीबाणी लादली असती.”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
25 जून 1975 को तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गाँधी ने अपनी तानाशाही मानसिकता को दर्शाते हुए देश में आपातकाल लगाकर भारतीय लोकतंत्र की आत्मा का गला घोंट दिया था। लाखों लोगों को अकारण जेल में डाल दिया गया और मीडिया की आवाज को दबा दिया गया। भारत सरकार ने हर साल 25 जून को ‘संविधान… pic.twitter.com/KQ9wpIfUTg
— Amit Shah (@AmitShah) July 12, 2024
तसंच आणीबाणीनंतर जनता पार्टीचं सरकार आलं, अटलबिहारी वाजपेयींचं सरकार आलं, चंद्रशेखर पंतप्रधान झाले. त्यापैकी कोणालाही कधी वाटलं नाही की संविधानाची हत्या झाली. मग हे कोण टिकोजीराव लागून गेले?, असा टोला देखील राऊत यांनी लगावला आहे.
संजय राऊतांसह कॉँग्रेस नेत्यांकडून मोदी सरकारवर टीका
दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉँग्रेस खासदार राहुल गांधी यांना थेट आव्हानच दिलं आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे संविधानावर खरोखरच प्रेम असेल तर, नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी मनुस्मृती जाळावी, अशी मागणीच प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करत केली आहे.
तसेच (Constitution Murder Day) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील टीका केली आहे.’जेव्हा मध्य प्रदेशातील भाजपचा नेता आदिवासींवर लघवी करतो, जेव्हा पोलिसांनी उत्तर प्रदेशातील हाथरसच्या दलित मुलीवर जबरदस्तीने अंत्यसंस्कार केले, तेव्हा ही संविधानाची हत्या नाही तर काय आहे?’, असा सवाल मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदींना केला आहे.
News Title – Constitution Murder Day
महत्त्वाच्या बातम्या-
बाहेर पडताना काळजी घ्या! राज्यात ‘या’ भागात आज अतिवृष्टीचा इशारा
“संविधानावर खरंच प्रेम असेल, तर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींनी मनुस्मृती जाळावी”
“मतदारांना धमकावून विजय?”; नारायण राणेंच्या खासदारकीला थेट हायकोर्टात आव्हान
“प्रत्येक आमदाराला 5 कोटींची ऑफर आणि..”; विधान परिषदेच्या निकालानंतर जितेंद्र आव्हाड यांचा दावा
कोट्यवधींचे दागिने, सोन्याचा लेहंगा..राधिकाच्या राजेशाही थाटाची एकच चर्चा; किंमत ऐकून चक्रावून जाल