बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवीन संसद भवनाच्या राष्ट्रचिन्हावरुन वाद, ‘या’ कारणामुळे विरोधक आक्रमक

नवी दिल्ली | भारत देशाच्या नवीन संसद भवनासमोरील (Parliament of India) असलेल्या चार सिंहांच्या राष्ट्रचिन्हाचे (National Emblem) काल (मंगळवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांच्या हस्ते उदघाटन झाले. आता या राष्ट्रचिन्हावरुन वाद पेटला आहे. विरोधी पक्ष आणि काही नेत्यांकडून या प्रतिकृतीला विरोध केला जातो आहे. या चिन्हाच्या स्वरुपात बदल झाल्याचे सगळ्यांचे म्हणणे आहे.

सम्राट अशोकाच्या (Samrat Ashok) काळात सारनाथ येथे उभारलेला स्तंभावरील “सिंह शिल्प” स्वतंत्र भारताची राजमुद्रा म्हणून स्वीकराले आहे. मुळात हे शिल्प आणि त्याच्या खाली असलेले हत्ती, बैल, दौडणारा घोडा आणि सिंह यांची कोरीव शिल्प हे सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग अधोरेखीत करतात. मानवतावादी, संपूर्ण प्राणीमात्रांविषयी करुणा असलेला विचार हे चार सिंह आहेत.

या सिंहाच्या डोळ्यावर गंभीर भाव आणि दृढ निश्चय आहे. त्यांचा जबडा नैसर्गिकरीत्या उघडला आहे. मानवतावादी, समतावादी विचार चारही दिशांना पसरावे म्हणून हे सिंह पाठीला पाठ लावून बसले आहेत. आणि हेच मानवतावादी, सर्वांप्रती स्वातंत्र्य, समता आणि बंधूभाव विचार स्वतंत्र भारताला सर्व जगात घोषित करायचे होते , म्हणूनच भारताच्या पहिल्या मंत्रीमंडळाने हे शिल्प भारताची राजमुद्रा म्हणून स्वीकार केले.

मात्र, अनावरण झालेल्या नवीन शिल्पात, चारही सिंहांचे भाव हिंस्र दाखविले आहेत. त्यामुळे या शिल्पाचा आणि त्यातील बोधाचा अपमान झाल्याचे म्हटले जात आहे. या मूळ राष्ट्रीय चिन्हाचे विकृतीकरण केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chaudhari) यांनी ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींकडे याची तक्रार केली आहे.

थोडक्यात बातम्या –

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा झटका!

भाजप नेत्याचा बेडरूममधील व्हिडीओ व्हायरल; महिलेने केले अत्यंत गंभीर आरोप

अभिनेता विद्युत जामवाल अडकणार लग्न बंधनात; लंडनमध्ये घेणार सात फेरे?

मोठी बातमी! ग्लोबल टीचर अवार्ड विजेते रणजित डिसले यांचा शिक्षकपदाचा राजीनामा

पुणेकरांनो सावध व्हा; ‘या’ पुलावरून जाणं तुमच्यासाठी ठरेल धोक्याचं

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More